नारायणवाडी येथे महिला उपसरपंचास मारहाण

नायक वृत्तसेवा, नेवासा
एकीकडे महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान होत असतानाच दुसरीकडे नेवासा तालुक्यातील नारायणवाडी येथे चक्क महिला उपसरपंचास मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

नारायणवाडी येथील उपसरपंच अश्विनी पेटे व त्यांचे पती प्रमोद पेटे यांना ग्रामपंचायत आवारात मारहाण करण्यात आली. याबाबत प्रमोद रावसाहेब पेटे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादीत म्हटले आहे की, माझी पत्नी ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आली आहे व सध्या नारायणवाडी ग्रामपंचायत येथे उपसरपंच आहे. मी व माझी पत्नी गावातील ग्रामपंचायतच्या कामानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात गेलो होतो. त्यावेळी गावातील मधुकर आसाराम कंठाळे व अशोक गोरक्षनाथ कंठाळे (दोघे रा.नारायणवाडी, ता.नेवासा) हे दोघे ग्रामपंचायत कार्यालयात येऊन मोठमोठ्याने शिवीगाळ करू लागले. त्यावेळी ते दारू पिलेले होते. मी त्यांना समजावून सांगत होतो, की कार्यालयात महिला आहे. तुम्ही शिवीगाळ करू नका, असे म्हणाल्याचा त्यांना राग आला. त्यावेळी त्यांनी मला शिवीगाळ केली. त्यानंतर मी ग्रामपंचायत कार्यालयातून बाहेर आलो व ग्रामपंचायतच्या आवारात उभा राहिलो. त्यावेळी दोघांनी मला मारहाण केली. मारहाणीमध्ये मार लागल्याने मी जोरजोरात ओरडलो. त्यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात असलेली माझी पत्नी व नाना हरिभाऊ धनक (रा. नारायणवाडी) यांनी मला त्यांच्या तावडीतून सोडविले. त्यावेळी वैशाली अशोक कंठाळे ही भांडणाचा आवाज ऐकून तेथे आली व माझी पत्नी अश्विनी हिला मारहाण केली. तसेच मुधकर कंठाळे यानेही माझ्या पत्नीला मारहाण केली. यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य हवालदार रेवणनाथ लगड हे करत आहे.

Visits: 158 Today: 1 Total: 1800973

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *