कडलग यांच्या ‘वादळ’ कादंबरीचे प्रकाशन उत्साहात

नायक वृत्तसेवा, संगमनेर
लेखक संदीप कडलग यांच्या ‘वादळ’ या नवीन मराठी कादंबरीचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. स्वयं प्रकाशन, पुणेच्या वतीने ही कादंबरी प्रकाशित करण्यात आली.

इगतपुरी येथील सॅमसोनाइट साऊथ आशिया प्रा. लिमिटेड गोंदे येथे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रमण्यम दत्ता यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक रमेश तैनवाला, उपाध्यक्ष वाय.एम. सिंग, नूतन उपाध्यक्ष पंकज चावला, मार्क्सवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड, मुंबई मुख्य कार्यालयाचे आर्थिक सल्लागार जे. के. मेनन आदी उपस्थित होते.संदीप कडलग यांचे लेखक म्हणून हे पहिलेच लेखन आहे. वादळ ही मराठी कादंबरी प्रबोधन पर असून स्त्रियांचे महत्त्व विशद करणारी १४६ पानाची आहे. लेखक संदीप कडलग हे इगतपुरी येथे कंपनी मध्ये कार्यरत असून ते निमगाव भोजापूर ता. संगमनेर येथील मूळ रहिवाशी आहेत. कडलग हे नाटकात ही अभिनय करतात आहे.

Visits: 156 Today: 1 Total: 1112421
