अवघ्या चोवीस तासांत संगमनेर तालुक्यात आढळले सुमारे शंभर रुग्ण! नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे जिल्हा पुन्हा ‘लॉकडाऊनच्या’ उंबरठ्यावर..!
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील कोविड संक्रमणात सातत्याने वाढ होत असून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर येण्याचा सिलसिला कायम आहे. गेल्या चोवीस तासांतच शहरातील तब्बल चाळीस जणांसह तालुक्यातून एकूण 93 रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या झपाट्याने पुढे सरकतांना आता 7 हजार 183 वर पोहोचली आहे. अर्थात यातील केवळ 302 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत. मात्र गेल्या 1 मार्चपासून कोविड संक्रमणातील झालेल्या वाढीने ओस पडलेली शहरातील रुग्णालये पुन्हा एकदा तुडूंब झाल्याचे वेदनादायी चित्रही सध्या दिसत आहे.
संगमनेर तालुक्यातून जवळपास संपुष्टात आलेले कोविड संक्रमण काही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा जोमाने सुरु झाले आहे. गेल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये झालेल्या काही विवाह सोहळ्यांनी अवघ्या तालुक्याच्या स्वास्थावरच हल्ला चढवला असून अनेकांना रुग्णालयात दाखल होण्यास भाग पाडले आहे. कोविड संक्रमणाला कारणीभूत ठरलेल्या अशा काही सोहळ्यांवर कारवाई करतांना प्रशासनाने आयोजनकर्त्यांवर दहा हजारांच्या दंडाची कारवाई केली आहे, मात्र अशा सोहळ्यांना उपस्थित राहीलेले आणि कोविडने जायबंदी होवून रुग्णालयांमध्ये दाखल झालेले कर्ज काढून आता लाखांची बिलं भरीत आहेत.
प्रशासनाकडून विवाह सोहळ्यातील उपस्थितीला मर्यादा घातलेल्या असतानाही अद्यापही तालुक्यात काहीजण त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे दिवसागणिक संगमनेर तालुक्यातील कोविडची स्थिती चिंताजनक होत आहे. काही जणांच्या अविचारी कृतीचा फटका संपूर्ण तालुक्याला बसत असल्याने प्रशासनाने कारवाईच्या पद्धतीत बदल करुन असे सोहळे आयोजित करुन संपूर्ण तालुक्याचे स्वास्थ बिघडवणार्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज सामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. त्यासोबतच केवळ जंगी सोहळे आयोजित करणार्यांवरच नव्हेतर अशा सोहळ्यांना हजेरी लावणार्यांवरही कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे.
गेल्या चोवीस तासांत प्राप्त झालेल्या दोन अहवालातून सरासरीचा वेग कायम राखताना तालुक्यात तब्बल 93 नवीन रुग्णांची भर पडली आहे. यात रंगारगल्लीतील 35 व 30 वर्षीय महिला, अकोले बायपासवरील 54 वर्षीय इसमासह 28 वर्षीय तरुण, शिवाजीनगर मधील 52 वर्षीय इसम, मालदाड रोडवरील 64 व 58 वर्षीय इसमांसह 37 व 24 वर्षीय महिला, सह्याद्री महाविद्यालयाच्या परिरातील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 53 वर्षीय महिला व 22 वर्षीय तरुण, नवीन नगर रस्त्यावरील 55, 52 व 45 वर्षीय इसमांसह 49 वर्षीय महिला, गणेशनगरमधील 55 व 48 वर्षीय इसम, स्वामी समर्थ नगरमधील 81 वर्षीय ज्येष्ठ नागरिक.
इंदिरानगरमधील 42 वर्षीय इसमासह 25 वर्षीय महिला, बाजारपेठेतील 48 वर्षीय दोन इसम, जनता नगरमधील 37 वर्षीय तरुण, साईश्रद्धा चौकातील 66 वर्षीय महिला, नेहरु चौकातील 35 वर्षीय तरुण, देवाचा मळा येथील 57 वर्षीय इसम, अकोले नाका परिसरातील 25 वर्षीय तरुण, गणेशविहार कॉलनीतील 34 वर्षीय तरुण, कुंभार आळा परिरातील 37 वर्षीय महिला, वकील कॉलनीतील 50 वर्षीय महिला, अरगडे मळ्यातील 45 वर्षीय इसम, मोतीनगर मधील 32 वर्षीय महिला व केवळ संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 61, 52, 45, 35 व 30 वर्षीय महिला आणि 40 व 23 वर्षीय तरुण शहरातील आदी चाळीस जणांना कोविडचे संक्रमण झाले आहे.
याशिवाय ग्रामीणभागातील मालदाड येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 35 वर्षीय तरुण, घारगाव येथील 44 वर्षीय इसम, चणेगाव येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 37 वर्षीय तरुण, आश्वी बु. मधील 36 व 28 वर्षीय तरुण, निमगाव बु. मधील 45 वर्षीय इसम व 27 वर्षीय तरुण, राजापूरमधील 42 वर्षीय महिला व 42 वर्षीय तरुण, चंदनापूरीतील 51 वर्षीय इसम, घुलेवाडीतील 49 व 48 वर्षीय इसम आणि 53 व 32 वर्षीय महिलेसह 15 वर्षीय मुलगा, शंकर टाऊनशिपमधील 38 वर्षीय महिला, पिंपळगाव कोंझिरा येथील 38 वर्षीय तरुण, सुकेवाडीतील 59 वर्षीय इसम, निमगाव जाळीतील 53 वर्षीय इसम, रायतेवाडीतील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, समनापूरमधील 28 वर्षीय महिलेसह सात वर्षीय बालक, निमगाव टेंभी येथील सात वर्षीय बालक, निमोण येथील 77 वर्षीय महिला, रहिमपूरमधील 75 वर्षीय महिलेसह 18 वर्षीय तरुण,
पिंपळगाव निपाणी येथील 30 वर्षीय महिला, चिंचपूर येथील 39 वर्षीय महिला, माळेगाव पठारावरील 54 वर्षीय इसम, पळसखेडे येथील 70 वर्षीय महिला, पिंपरणे येथील 31 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 63 व 45 वर्षीय महिला व 37 वर्षीय तरुण, सायखिंडी शिवारातील 54 वर्षीय इसम, जवळे कडलग येथील 60 वर्षीय महिलेसह 55 व 53 वर्षीय इसम आणि 25 वर्षीय तरुण, कर्हे येथील 26 वर्षीय इसम, नान्नज दुमाला येथील 53 वर्षीय इसम, तळेगाव दिघे येथील 60 वर्षीय महिला, शिबलापूर येथील 31 वर्षीय तरुण, पिंपरी येथील 32 वर्षीय महिला, बांबलेवाडी येथील 32 वर्षीय तरुण, निमोण येथील 23 तरुण, जोर्वे येथील 24 वर्षीय महिला आणि मंगळापूर येथील 30 वर्षीय तरुणाचा अहवाल संक्रमित असल्याचा प्राप्त झाला आहे. त्यामुळे तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत अवघ्या 24 तासांतच तब्बल 93 रुग्णांची भर पडून रुग्णसंख्या आता 7 हजार 183 वर जावून पोहोचली आहे. आत्तापर्यंत तालुक्यातील 57 रुग्णांचे कोविडने बळीही घेतले आहेत. आजच्या स्थितीत तालुक्यातील केवळ 302 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत.
कोविडच्या संक्रमणाकडे दुर्लक्ष करुन तालुक्यात साजर्या झालेल्या काही विवाह सोहळ्यांनी संगमनेर तालुक्याला पुन्हा एकदा कोविड संक्रमणाच्या दिशेने लोटले आहे. त्याचा परिणाम गेल्या 20 दिवसांत समोर आला असून दररोज रुग्णसंख्येत मोठी भर पडत आहेत. असे असतांनाही आजही तालुक्यातील ग्रामीणभागात मोठ्या उपस्थितीत असे सोहळे होतच असल्याने प्रशासनाला कारवाईच्या पद्धतीत बदल करण्याची वेळ आली आहे. अशा सोहळ्यांच्या आयोजनकर्त्यांसह उपस्थित राहणार्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आता सामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे जिल्हा पुन्हा ‘लॉकडाऊनच्या’ उंबरठ्यावर..!
राज्यात दररोज कोविड बाधितांची संख्या वाढत असतांना अहमदनगर जिल्ह्यातील कोविडस्थितीही दिवसोंदिवस पूर्ववत होत आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. फेब्रुवारीत जिल्ह्यात सरासरी शंभर रुग्ण दररोज या वेगाने रुग्णवाढ सुरु होती, मात्र मार्चपासून त्यात जवळपास तिप्पट वाढ झाली असून आजच्या स्थितीत रोज 310 रुग्ण सरासरी समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी सहा वाजता जिल्हा प्रशासनासह जिल्हा आरोग्य यंत्रणेशी संवाद साधणार असून सध्या राबविल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती घेणार आहेत. त्यानंतर कदाचित जिल्ह्यात अंशतः ‘लॉकडाऊन’ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अहमदनगर जिल्ह्याप्रमाणेच शेजारील औरंगाबाद जिल्ह्याची स्थिती आहे. लोकसंख्येच्या दृष्टीनेही दोन्ही जिल्हे जवळपास समान आहेत. त्यातच औरंगाबादमध्ये कोविड संक्रमणाला गती मिळाल्यानंतर तेथे अंशतः लॉकडाऊनची घोषणा झाली आहे. आज सायंकाळी खुद्द मुख्यमंत्री अहमदनगरच्या गंभीर होत चाललेल्या कोविड स्थितीबाबत माहिती घेणार असल्याने कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबविल्या जाण्याची दाट शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
गर्दी टाळा, नियमानुसारच लग्न सोहळे उरका अशा महत्त्वाच्या सूचना वारंवार दिल्या जावूनही नागरिकांना त्याचे गांभीर्य समजले नाही. त्याचा परिणाम जिल्ह्यात कोविडचे संक्रमण परतले असून त्याच्या प्रादुर्भावाची गती पूर्वीपेक्षा तिपटीने अधिक आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासन सतर्क झाले असून कठोर उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे. काही मनमौजी आणि असंवेदनशील नागरिकांच्या कृत्याचा फटका आता लाखों सामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता निर्माण झाली असून जिल्ह्यात पुन्हा ‘लॉकडाऊन’चे वातावरण तयार झाले आहे.