‘सातपाटील कुलवृत्तांत’वर रविवारी परिसंवाद

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ज्येष्ठ साहित्यिक व लेखक प्रा.रंगनाथ पठारे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला असून त्यांनी लिहिलेल्या ‘सातपाटील कुलवृत्तांत’ या कादंबरीवर जयहिंद लोकचळवळीच्यावतीने रविवारी (ता.7) दुपारी 4 वाजता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालय येथे परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

सह्याद्री महाविद्यालयाच्या के.बी. दादा सभागृहात हा परिसंवाद आयोजित केला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रंगनाथ पठारे यांची प्रमुख उपस्थिती आहे. तर प्रसिद्ध कवी प्रा.पोपट सातपुते हे या विषयावर आपले मनोगत व्यक्त करणार आहे. हा परिसंवाद सर्वांसाठी मोफत असून या कार्यक्रमासाठी संगमनेरमधील जास्तीत जास्त साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रकल्पप्रमुख बंटी साळवे व जय हिंद लोकचळवळीच्यावतीने करण्यात आले आहे.

Visits: 198 Today: 1 Total: 1919896

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *