शुक्राचार्य मंदिरातील महाशिवरात्री उत्सव कोरोनामुळे रद्द
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
सद्गुरु श्री शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट कोपरगाव बेट तर्फे दरवर्षी साजरा केला जाणारा मंदिराचा सर्वात मोठा वार्षिक उत्सव महाशिवरात्री यावर्षी गुरुवारी (ता.11) येत आहे. सालाबादप्रमाणे यंदाचा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात करण्याचे मंदिर प्रशासनाने ठरविले होते, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दिली. परंतु सध्या कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने सरकारच्या नियमांना अधीन राहून महाशिवरात्री उत्सव रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोपरगाव बेट देवस्थान तर्फे दरवर्षी साजरा केला जाणारा महाशिवरात्रीचा उत्सव रद्द करण्यात आल्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर सर्व भक्तांसाठी बंद राहणार आहे. परंतु फेसबुक लाईव्हद्वारे मंदिरातील पुजार्यांकडून होत असलेल्या पूजारती, अभिषेक याचे लाईव्ह प्रक्षेपण केले जाईल. तरी सर्वांनी घरी बसून या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे. यावेळी अॅड.एस.डी.कुलकर्णी, अॅड.दिलीप कोन्हाळकर, एस.एल.कुलकर्णी, हेमंत पटवर्धन, सचिन परदेशी, प्रसाद पन्हे, संजय वहांगळे, मुन्ना आव्हाड, विशाल राऊत, भाऊसाहेब आव्हाड, मधुकर साखरे, भागचंद रुईकर, नरेंद्र आव्हाड, बाळासाहेब लकारे, विलास आव्हाड, दिलीप सांगळे, आदिनाथ ढाकणे, बाळासाहेब गाडे, विलास आव्हाड, विजय रोहम, रवी आढाव, तुषार आव्हाड आदी उपस्थित होते.