विवाहितेच्या छळ प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा

नायक वृत्तसेवा, राहुरी
लग्न समारंभात मानपान दिले नाही, तसेच माहेरहून एक लाख रूपये आणावेत. या मागणीसाठी वैशाली घुगरे हिचा सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी चौघांविरोधात राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, वैशालीचा विवाह वांबोरी येथील संदीप नामदेव घुगरे याच्याबरोबर सुमारे तीन वर्षांपूर्वी झाला होता. वैशाली हिला लग्नानंतर एक वर्ष व्यवस्थित नांदविण्यात आले. मात्र, त्यानंतर वेळोवेळी तिला सासरी विवाह समारंभात मानपान दिले नाही. तसेच तिने माहेरहून एक लाख रूपये आणावेत, या मागणीसाठी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी वैशाली घुगरे हिने दिलेल्या फिर्यादीवरून पती संदीप घुगरे, सासरे नामदेव घुगरे, सासू कांताबाई घुगरे, मामासासरे नामदेव पंडित (रा.वांबोरी) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आव्हाड करत आहेत.

Visits: 144 Today: 1 Total: 1951436

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *