कोपरगावात हद्दपार आरोपीस अटक

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
हद्दपार असूनही कोपरगाव शहरात वास्तव्यास असलेल्या राहुल शिवाजी शिदोरे (वय 21, रा.गोकुळनगरी, कोपरगाव) यास पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, पोलीस अधीक्षकांनी शिदोरे यास संपूर्ण अहमदनगर जिल्हा, लगतच्या नाशिक जिल्ह्यातील येवला व सिन्नर तालुका, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याच्या महसूली हद्दीबाहेर 20 महिन्यांकरीता हद्दपार करण्याचा आदेश 9 जानेवारी, 2021 रोजी बजावला होता. असे असतानाही शिदोरे कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्याची खबर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना मिळाली. यावरून सहाय्यक फौजदार ससाणे, खारतोडे, शिंदे यांना सोबत घेऊन त्यास अटक केली.

Visits: 170 Today: 1 Total: 1959098

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *