रिंकू शर्माच्या मारेकर्‍यांना कठोर शिक्षा द्या! संगमनेर बजरंग दलाची निवेदनातून मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दिल्ली येथील बजरंग दलाचा कार्यकर्ता रिंकू शर्मा याची घरात घुसून हत्या करण्यात आली. यातील आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा संगमनेर बजरंग दलाने निवेदनातून दिला आहे.

तहसीलदार अमोल निकम यांना शनिवारी (ता.20) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिल्ली येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचा कार्यकर्ता रिंकू शर्मा हा अयोध्या येथील श्रीराम मंदिर निधी अभियानांतर्गत निधी संकलन करत होता. याचा राग मनात ठेवून विशिष्ट समुदायाच्या लोकांनी त्याची घरात घुसून हत्या केली. त्यामुळे यातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी बजरंग दलाचे कार्याध्यक्ष गोपाल राठी, प्रखंड मंत्री विशाल वाकचौरे, वाल्मिक धात्रक, सचिन कानकाटे, शुभम कपिले, रवींद्र मंडलिक आदी कार्यकर्त्यांनी केली आहे.

Visits: 97 Today: 2 Total: 1100340

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *