पेंडशेत येथील मंदिरातून देवाचे मुखवटे लंपास राजूर पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यात देवाचे मुखवटे चोरी झाल्याची घटना घडली आहे. पेंडशेत गावातील हनुमान मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी देवाचे मुखवटे लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. शुक्रवारी पहाटे 5.15 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान या मुखवट्याची किंमत सुमारे 47 हजार रुपये अशी आहे.
कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या पेंडशेत गावातील हनुमान मंदिर आहे. या मंदिरात गावातील पुजारी काळू तुकाराम ओळे हे मागील चार वर्षांपासून देवाची पूजा करतात. पूजा आटोपल्यावर देव पुन्हा गाभार्यात ठेवले जातात. शुक्रवारी सकाळी पाच वाजता देवाची पूजा करण्यासाठी ओळे हे गेले असता देवाचे मुखवटे दिसून आले नाहीत. त्यांनी शोधाशोध केली मात्र देवाचे मुखवटे कोठेही आढळले नाही. देवाचे मुखवटे चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहे. दरम्यान, सततच्या चोर्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.