… ब्राह्मणीतील बेपत्ता मुलीचा अखेर मृतदेह आढळला

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील ब्राह्मणी गावात ऊस तोडणी कामगाराच्या बेपत्ता साडेचार वर्षीय मुलीचा मृतदेह सोमवारी (ता.15) सकाळी विहिरीत आढळून आला आहे. ब्राह्मणी-जुना वांबोरी रस्त्या रस्त्यालगत ऊस तोडणी कामगाराचा अड्डा आहे. त्यापासून एक हजार मीटर अंतरावरील विहिरीमध्ये हा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी दिली आहे.

शुक्रवारी मध्यरात्रीपासून मुलगी ऊस तोडणी कामगारांच्या झोपडीतून बेपत्ता होती. शनिवारी कुटुंबियांनी दिवसभर तपास केला. मात्र शोध लागला नव्हता. अखेर शनिवारी सायंकाळी राहुरी पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाला. रविवार सकाळपासून श्रीरामपूर पोलीस विभागाचे उपाधीक्षक संदीप मिटके यांच्यासह नगरमधील शीघ्र कृती दलाच्या पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरू होते. अखेर सोमवारी सकाळी ब्राह्मणी गावातच वांबोरी रस्त्यालगत एका विहिरीत मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

Visits: 67 Today: 2 Total: 1115328

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *