कोपरगावच्या माजी शिवसेना शहरप्रमुखास ठार मारण्याची धमकी

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
मेडीकल चालविण्यासाठी हफ्त्यापोटी दरमहा दहा हजार रुपये द्या. अन्यथा कोयत्याने जीवे ठार मारण्याची खंडणीखोराने शिवसेनेच्या माजी शहरप्रमुखाला धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खंडणीखोराच्या विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिवसेनेचे माजी शहरप्रमुख तथा प्रगती मेडीकलचे चालक भरत आसाराम मोरे (रा. सप्तर्षीमळा) यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सप्तर्षीमळा येथे प्रगती मेडीकल दुकान असून राहण्यासही त्याच परिसरात आहेत. रविवारी सायंकाळी पावणे आठ वाजता सचिन संजय साळवे (रा.गजानननगर) हा मेडिकलवर आला. त्याने मेडीकल चालविण्यासाठी हफ्त्यापोटी दरमहा दहा हजार रुपये मागून हातातील लोखंडी कोयत्याने जीवे ठार मारण्याची भीती घालत शिवीगाळ करुन धमकी दिली असल्याचे म्हटले आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी भा.दं.वि. कलम 387, 452, 504, 506 प्रमाणे भारतीय हत्यार कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Visits: 141 Today: 1 Total: 1109528

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *