शिर्डीमध्ये शिक्षिकेचा मुख्याध्यापकाकडून विनयभंग

नायक वृत्तसेवा, शिर्डी
एका विद्यालयाच्या मुख्याध्यापकाने सहकारी महिला शिक्षिकेचा विनयभंग केल्याची घटना शिर्डीमध्ये घडली आहे. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी मुख्याध्यापकाविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. गंगाधर विश्वनाथ वरघुडे (वय 52, रा.शिर्डी) असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, शिर्डी संस्थानच्या विद्यालयात संबंधित महिला शिक्षिका गेल्या पाच वर्षांपासून नोकरी करत असून, मुख्याध्यापक गंगाधर वरघुडे हा वेळोवेळी वाईट नजरेने बघणे, कामाच्या ओघात शरीर स्पर्श करणे, कार्यालयात गेल्यावर वाईट हेतूने पकडणे अशी कृत्य करत होता. याबाबत वरिष्ठांना माहिती दिली होती. मात्र कठोर कारवाई न झाल्याने त्याचे धाडस वाढतच गेले. त्यातच 6 फेब्रुवारी, 2021 रोजी दोन वाजेच्या सुमारास कर्तव्यावर असतांना वरघुडे याने काम आहे, असे सांगत कार्यालयात बोलावले व मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ दाखवण्यास सुरुवात केली. त्यास नकार दिला असता जबरदस्ती केली. मदतीसाठी ओळखीच्या शिक्षिकेला विनंती केली असता त्यांनी देखील त्यांना असे करू नका असे सांगितले. त्यावेळी त्यांनी झालेला प्रकार कोणाला सांगितला ‘तर संपवून टाकीन माझ्या राजकीय ओळखी फार आहेत. त्यामुळे कोणाला काही सांगू नका’ अशी धमकी दिली, असे पीडित शिक्षिकेने फिर्यादीत म्हटले आहे. यावरुन शिर्डी पोलिसांनी मुख्याध्यापक गंंगाधर वरघुडे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Visits: 88 Today: 3 Total: 1102033

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *