सावरगाव घुलेचे सरपंचपद रिक्त तर उपसरपंचपदी नामदेव घुले
![]()
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले ग्रामपंचायतचे सरपंच रिक्त राहिले असून उपसरपंचपदी नामदेव कोंडाजी घुले यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सावरगाव घुले ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण हे अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव निघाले आहे. मात्र, निवडून आलेला उमेदवार हा पुरुष असल्याने हे पद रिक्त राहिले आहे. या निवडीवेळी शेतकरी विकास मंडळाचे सर्व नऊ सदस्य उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रहाणे, तलाठी ताजणे, ग्रामसेवक मलपुरे यांनी काम पाहिले. सरपंच पदासाठी राजू भाऊसाहेब खरात यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. मात्र आरक्षण अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असल्याने खरात यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला, तर नामदेव घुले यांचे उपसरपंच पदासाठी एकमेव नामनिर्देशन पत्र आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित सदस्य लिलाबाई लहानू घुले, सुजाता नवनाथ घुले, सीमा बाबासाहेब कडू, प्रणाली शिवाजी बोर्हाडे, अलका जिजाबा घुले, राजेंद्र शत्रुघ्न घुले, घमाजी भुतांबरे आदी उपस्थित होते. निवडीनंतर शेतकरी विकास मंडळाचे माजी सरपंच रेवजी घुले, शेतकी संघाचे संचालक अर्जुन घुले, सोसायटीचे अध्यक्ष लहानू घुले, तंटामुक्तीचे अध्यक्ष जालिंदर घुले, खंडोबा देवस्थान ट्रस्टचे सचिव गोरक्षनाथ मदने, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब घुले, भाऊसाहेब खरात, माजी सरपंच पांडुरंग राऊत, सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण वाघ, माजी सरपंच पूनम मदने, युवक काँग्रेसचे बोटा गटाचे अध्यक्ष सुहास घुले, सोसायटीचे सचिव बाळासाहेब घुले, खंडोबा देवस्थानचे विश्वस्त संतोष घुले, पत्रकार बाबासाहेब कडू, सावळेराम घुले, किरण घुले, कैलास बोर्हाडे, भानुदास घुले, संतोष बोर्हाडे, दिनकर घुले, टाळूचीवाडी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते भारत कोठवळ आदिंनी नूतन उपसरपंच आणि नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

भावी सरपंच राजू खरात आणि उपसरपंच नामदेव घुले यांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार डॉ.किरण लहामटे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत 9 विरुद्ध 0 केल्याबद्दल सर्व सूज्ञ मतदार आणि शेतकरी विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

उपसरपंचपदी निवड झालेले नामदेव घुले यांनी तिसर्यांदा ग्रामपंचायत निवडणूक लढवत मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. तसेच ग्रामपंचायत कायद्याचे अभ्यासक व यशदाच्यावतीने संपूर्ण राज्यात पंचायत राजचे प्रशिक्षण ते देतात. पंचायत राजचा सखोल अभ्यास असल्याने त्यांच्या ज्ञानाचा उपयोग सावरगाव घुले ग्रामपंचायतला होणार आहे. यापूर्वी त्यांनी 2014-15 मध्ये सरपंच पदाचा कार्यभार देखील सांभाळला आहे. आत्ता सुद्धा नवनिर्वाचित सरपंच पदाची अधिकृत घोषणा होईपर्यंत तेच सरपंच आणि उपसरपंच या दोन्ही पदांचा कार्यभार पाहणार आहेत.
