बँजो संच घेण्यासाठी विवाहितेचा छळ

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथील एका विवाहितेचा बँजो संच घेण्यासाठी माहेराहून दीड लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ करुन दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन घराबाहेर काढून दिल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांत सासरच्या पाच व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यता आला आहे.

या प्रकरणी विवाहिता परवीन राजमहंमद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पती राजमहंमद उस्मान शेख, सासरा उस्मान बालम शेख, भाया अश्पाक उस्मान शेख, दीर अस्लम उस्मान शेख आणि नणंद नजमा राशिद खान यांनी 24 मे, 2004 पासून ते जून 2017 पर्यंत बँजो संच घेण्यासाठी माहेराहून दीड लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. यासाठी सतत शारीरिक व मानसिक छळ केला, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन मुलांसह घराबाहेर काढून दिले असल्याचे म्हटले आहे. यावरुन पोलिसांनी वरील सासरच्या पाचही व्यक्तींविरोधात गुरनं.27/2021 भादंवि कलम 498 अ, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य हवालदार आर.व्ही.खेडकर हे करत आहे.

Visits: 192 Today: 1 Total: 2059597

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *