श्रीराम मंदिरासाठी ‘सर्वोदय’कडून दीड लाखांची देणगी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील सहकारात अग्रगण्य असणार्‍या सर्वोदय पतसंस्थेने अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी 1 लाख 51 हजार 111 रुपयांचा धनादेश नुकताच निधी संकलन करणार्‍या स्वयंसेवकांकडे सुपूर्द केला आहे.

अयोध्या येथे श्रीराम मंदिराची उभारणी करण्यासाठी संपूर्ण देशभर निधी संकलन अभियान सुरू करण्यात आले आहे. या पवित्र कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा या उदात्त हेतूने संस्थेने 1 लाख 51 हजार 111 रुपयांचा धनादेश अध्यक्ष शैलेंद्र ओहरा, उपाध्यक्ष महेश कटारिया, संचालक वैभव शाह, शरद ओहरा, सुभाष शाह, सुरेश शाह, राजेश दोशी, संकेत शाह व अरुण नारायणे यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक अशोक सराफ, तालुका सहसंघचालक सुभाष कोथमिरे, माजी नगरसेवक शिरीष मुळे, ज्ञानेश्वर कर्पे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी संस्थेचे संचालक कल्पेश मेहता, आशिष शाह, सचिन शाह, दर्शन मेहता, सचिन येवंतीलाल शाह, राजेंद्र काळे, नितीन भागवत, श्वेता मेहता, राखी शाह आदी उपस्थित होते. याकामी संस्थेचे व्यवस्थापक मधुकर वनम व सहाय्यक व्यवस्थापक राजेश ढगे यांच्यासह कर्मचार्‍यांनी मदत केली.

Visits: 155 Today: 1 Total: 1951974

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *