रविवारपासून रंगणार नामदार चषकाचा थरार
![]()
नायक वृत्तसेवा, संगमनेर
युवकांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी राजवर्धन यूथ फाऊंडेशनच्यावतीने सातव्या वर्षी कोल्हेवाडी फाटा, वडगाव पान येथे रविवार दि. 7 ते 13 फेब्रुवारी, 2021 या कालावधीत भव्य नामदार चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या थरारासाठी मैदानाची जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती सिद्धार्थ थोरात यांनी दिली आहे.

या स्पर्धेचा प्रारंभ रविवारी सकाळी 10 वाजता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, दुर्गा तांबे, कांचन थोरात, इंद्रजीत थोरात, रणजीतसिंह देशमुख व सत्यजीत तांबे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी युवा नेते राजवर्धन थोरात उपस्थित राहणार आहेत. नामदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भव्य व आकर्षक मैदान तयार करण्यात आले असून प्रथम बक्षीस के.के.थोरात यांच्यावतीने 1,01,111 (एक लाख एक हजार एकशे अकरा) रुपये व चषक, द्वितीय बक्षीस शतानंद खामकर व डॉ.निजानंद खामकर यांच्यावतीने 71,111 (एकाहत्तर हजार एकशे अकरा) रुपये व चषक, तृतीय बक्षीस नवनाथ अरगडे व अभिजीत ढोले यांच्यावतीने 41,111 (एक्केचाळीस हजार एकशे अकरा) रुपये व चषक, चतुर्थ बक्षीस सुनील गुंजाळ व आर.डी.थोरात यांच्यावतीने 31,111 (एकतीस हजार एकशे अकरा) रुपये व चषक देण्यात येणार आहे. अजय फटांगरे व आर.एम.कातोरे यांच्यावतीने ‘मॅन ऑफ द सिरीज’साठी दुचाकी देण्यात येणार आहे. प्रत्येक संघातील खेळांडूसाठी महेंद्र गोडगे यांच्यावतीने टी शर्ट तर सुभाष सांगळे यांच्यावतीने संपूर्ण स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. याशिवाय वैयक्तिक स्वरुपाची अनेक बक्षिसे या स्पर्धेत देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी आयुष 11 वडगाव पान, जवळे कडलग सुपर फायटर्स, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी मंच, साई बालाजी लोणी, राजा विरोबा साकूर, अजय फटांगरे युवा मंच सारोळे पठार, साई स्पोर्ट्स वडगाव पान, श्रावणी 11/अनुष्का फायटर्स मेंढवण, रुद्रा प्रतिष्ठान कोल्हेवाडी, लक्ष्मी माता फायटर्स मनोली, छावा 11 सुकेवाडी, जहाँबाज 11 कुरण हे 12 संघ प्रीमिअर लीगमधून खेळणार आहेत. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राजवर्धन यूथ फौंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष प्रयत्न करत आहेत.
