अकोले तालुक्यात सरासरी 81 टक्के मतदान; तर घोडसरवाडीची निवडणूक रद्द उंचखडक बुद्रुक व ढोकरी येथे शाब्दिक बाचाबाची; आता सोमवारच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा


नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील 36 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता.15) सरासरी 81 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उंचखडक बुद्रुक व ढोकरी येथे शाब्दिक बाचाबाची वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. तत्पूर्वी 15 ग्रामपंचायत अगोदरच बिनविरोध झाल्या आहेत. तर घोडसरवाडी येथे ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने रद्द झाली आहे. आता निवडणूक रिंगणातील 566 उमेदवारांच्या (सोमवार ता.18) निकालाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

अकोले तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असणार्‍या कळस बुद्रुक, नवलेवाडी, धुमाळवाडी, ढोकरी, उंचखडक बुद्रुक, आंबड, मेहेंदुरी, देवठाण, वीरगाव या गावांत मोठी चुरस दिसली. मतदान घडवून घेण्यासाठी पुढार्‍यांची प्रचंड रस्सीखेच दिवसभर होती. औरंगपूर व परखतपूर येथे एका जागेसाठी निवडणूक होती. या निवडणुकीसाठी मातब्बर नेते जिल्हा परिषद सदस्य कैलास वाकचौरे, जालिंदर वाकचौरे, रमेश देशमुख, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण शेळके आपापल्या गावात तळ ठोकून होते.

36 ग्रामपंचायतींची मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे – नवलेवाडी 60.8, धुमाळवाडी 75.50, औरंगपूर 85.15, उंचखडक बु॥ 93.23, अंबड 87.58, इंदोरी 80.64, रूंभोडी 79.26, टाकळी 91.25, ढोकरी 92.75, मेहेंदुरी 87.16, तांभोळ 89.75, वीरगाव 81.16, पिंपळगाव निपाणी 84.31, हिवरगाव आंबरे 86.09, गणोरे 79.47, परखतपूर 75.63, वाशेरे 87.82, कळस बु॥ 84.59, कळस खु॥ 89.63, सुगाव खु॥ 89.03, कुंभेफळ 82.47, पिंपळगाव खांड 82.96, पांगरी 80.53, धामणगाव आवारी 84.05, धामणगाव पाट 84.84, कोतूळ 77.32, नाचणठाव 78.90, बोरी 83.27, मन्याळे 71.87, लिंगदेव 79.08, लहित बु॥ 85.03, पिंपळदरी 86.45, ब्राह्मणवाडा 71.93, बदगी 77.23, बेलापूर 77.89 व देवठाण 82.31 अशाप्रकारे मतदान झाले असून मतमोजणी सोमवारी (ता.18) होणार आहे. यामध्ये कोण बाजी मारणार अन् कोणाची प्रतिष्ठा टिकून राहणार याबाबत खल सुरू आहेत.

Visits: 177 Today: 1 Total: 1098072

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *