कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे लाक्षणिक उपोषण

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
येथील पालिकेची मंगळवारी (ता.12) सकाळी स्थायी समितीची बैठक झाली. यावेळी भाजपच्या कोल्हे गटाने पुन्हा एकदा आपला नकारात्मक दृष्टीकोन दाखवून देत विकासकामांना खीळ घालण्याचा प्रकार केला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आज (बुधवार ता.13) सकाळपासून काँग्रेसला सोबत घेत लाक्षणिक उपोषण केले आहे.

मंगळवारी पार पडलेल्या बैठकीस नगराध्यक्ष विजय वहाडणे, सत्ताधारी गटाचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, गटनेते रवींद्र पाठक,आरोग्य सभापती अनिल आव्हाड व त्यांचे अन्य सहकारी उपस्थित होते. यावेळी भाजपच्या कोल्हे गटाने आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे श्रेय वहाडणे गटास मिळू नये यासाठी पाचर मारल्याची चर्चा नागरिकांत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे स्थायी समितीचे सदस्य मंदार पहाडे यांनी कालच टीकास्त्र सोडले होते. आणि बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केल्याने शहरातील राजकीय वातावरण ऐन थंडीत गरमागरम झाले आहे.

Visits: 130 Today: 1 Total: 2126746

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *