राहाता पंचायत समितीवर अंगणवाडी सेविकांचे निदर्शन

नायक वृत्तसेवा, राहाता
जिल्हा कर्मचारी यूनियनच्यावतीने अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी राहाता पंचायत समितीवर नुकतेच निदर्शन केले. यावेळी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती.नागरे यांनी निवेदन स्वीकारले.

अंगणवाडी कर्मचार्‍यांना सेवासमाप्तीनंतर देण्यात येणारा एकरकमी लाभ हा तुटपुंजा आहे. त्यातून कर्मचार्‍यांचा उदरनिर्वाह होणे शक्य नाही. त्यामुळे एकरकमी लाभाबरोबरच दरमहा निवृत्तीवेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी यूनियनच्यावतीने निदर्शन करून निवेदन देण्यात आले. या निदर्शनामध्ये यूनियनचे सरचिटणीस राजेंद्र बावके, जीवन सुरुडे, ज्योती बोराडे, मनीषा जाधव, सुरेखा पाळंदे, नसीमा शेख, ज्योती डहाळे, नंदा दिघे, सुनीता कवडे, वैशाली नाईक, वंदना गमे, प्रतिभा निकाळे, सरला रहाणे, मंदा वाबळे, शकीला हकीम, संगीता वाघ, रंजना साळुंके, पुष्पलता धनवटे, मंदा दातीर, सुनीता आहेर, आशाबी शेख, कुसूम फाजगे, मीरा सावलके, शीला पिलगर, अर्चना कचवे आदी अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते.

Visits: 156 Today: 1 Total: 1786968

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *