व्यावसायिकांसह प्रवाशी वाहनचालकांना सहकार्य करा!
व्यावसायिकांसह प्रवाशी वाहनचालकांना सहकार्य करा!
कोल्हार-घोटी महामार्गाच्या कामासंदर्भात अकोल्यातील राष्ट्रवादी कार्यालयात बैठक
नायक वृत्तसेवा, अकोले
कोल्हार-घोटी महामार्गाचे काम थोड्याच दिवसांत चालू होणार असल्याने अकोले शहर व्यापारी संघटना, अपरिहार्य चालक संघटना व रिक्षा चालक-मालक संघटना यांची मते जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या सूचनेनुसार बुधवारी (ता.2) बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहरवासियांना मोकळा श्वास घेता यावा, व्यावसायिकांना आणि प्रवासी वाहन धारकांना सहकार्य अशा विविध सूचना उपस्थितांनी मांडल्या.

या बैठकीस व्यापारी, छोटे व्यावसायिक, रिक्षा चालक-मालक, टपरीधारक यांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडलया. अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, कार्याध्यक्ष राजेंद्र कुमकर, शहराध्यक्ष अमित नाईकवाडी, तालुका युवकाध्यक्ष रवी मालुंजकर, सचिव विकास बंगाळ, जिल्हा उपाध्यक्ष बबन वाळुंज, उपाध्यक्ष पराग वाडगे, पंकज नाईकवाडी, महेश शेलार, सचिव संदीप शेणकर, युवक सरचिटणीस संतोष नाईकवाडी, दिव्यांग सेलचे अमर मुरुमकर आदिंच्या उपस्थितीत ही बैठक उत्साहात पार पडली.

यावेळी झालेल्या चर्चेत शहरातील महात्मा फुले चौकाचे सुशोभीकरण करुन वर्तुळ उभारावे, पायी चालणारे शालेय विद्यार्थी व प्रवाशांसाठी फूटपाथ उपलब्ध करुन द्यावे, दुभाजकावर पथदिवे बसवावे, वाहनतळ व्यवस्था सुधारावी, रिक्षा संघटनेसाठी अधिकृत थांबा द्यावा, अशा विविध लोकोपयोगी सूचनांवर साधक चर्चा झाली. या चर्चेत ज्येष्ठ नेते सुरेश गडाख, अरुण रुपवते, सुनील गुजर, राजेंद्र नाईकवाडी, प्रवीण झोळेकर, गणेश कानवडे, मयूर रासने, नितीन वलवे, संजय जंगम, अमृता गायकवाड, राजेंद्र माने, राजेंद्र नवले, गणेश बोर्हाडे, अनिता नाईकवाडी, जगन्नाथ खर्डे, बाळासाहेब शेटे, सखाहरी धुमाळ, भाऊराव आंबेडकर, रफीक मणियार, युसूफ मणियार, संजय रासने, मिलिंद रुपवते, आनंद चौधरी, शरद गोसावी, कैलास ताजणे, कपिल समुद्र, शुभम खर्डे, राजेंद्र बोर्हाडे, माधव चौधरी, दत्ता नवले (मनसे), महेश हासे, प्रमोद आभाळे, संतोष चौधरी, बाळासाहेब चौधरी, नारायण चौधरी, वाजिद शेख, राजेश गुरुकुले, अभिषेक रासने, ताजमंहमद शेख, संकेत घोलप, अमोल नाईकवाडी, भागवत शेटे, रजनिकांत भांगरे, निसार शेख, सुबोध बोर्हाडे, अनिल शिंदे, आशुतोष शिंदे, परवेज शेख, सोमनाथ काळे, जहूर शेख, योगेश नवले, मन्सूर शेख आदिंनी चर्चेत सहभाग नोंदवला.

