दिव्यांगाची आंतरिक शक्तीच दिव्यशक्ती असते ः लहामगे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
धावत्या युगात स्वतःकडे बघण्यासाठी कोणालाही वेळ नाहीये. त्यामुळे कोणाचा आधार मिळेल या आशेवर न थांबता ध्येयाने प्रेरित होऊन व जिद्दीने पुढे जाणार्‍यांची प्रेरणा घेवून उमेदीने पुढे गेले पाहिजे याचा अनुभव पत्रकार गोरक्ष नेहे यांच्यावरुन घेता येतो. दिव्यांगावर मात करत पत्रकारितेत अवीट ठसा उमटवून दिव्यांगाची आंतरिक शक्तीच दिव्यशक्ती असल्याचे त्यांनी सिद्ध केले असल्याचे प्रतिपादन दिव्यांग सहाय्य सेनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर लहामगे यांनी केले आहे.

संगमनेरातील एका वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी असलेले गोरक्ष नेहे यांना सरपंच सेवा संघामार्फत पत्रकारितेतील योगदानाबद्दल आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर केला आहे. यानिमित्ताने संघटनेने शासकीय विश्रागृहात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करुन यथोचित सत्कार केला आहे. याप्रसंगी दिव्यांग कर्मचारी संघटनेचे संचालक राजू आव्हाड, तालुकाध्यक्ष प्रेमनाथ डोंगरे, उपाध्यक्ष शिवाजी आव्हाड, सचिव सचिन रणाते, पांडुरंग कासार, एकनाथ लोंढे, कांचन गायकवाड, सुनील खरे, प्रमोद मिसाळ, पत्रकार भारत रेघाटे आदी उपस्थित होते.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कामात माझे घर जात होते. याबाबत मी पत्रकार गोरक्ष नेहे यांना लक्ष घालण्याची विनंती केली. त्यांनी तात्काळ तत्कालिन प्रांताधिकार्‍यांशी बोलून प्रश्न सोडविला. याप्रमाणे त्यांनी अनेकदा दिव्यांग बांधवांचे प्रश्न पत्रकारितेच्या माध्यमातून तडीस नेलेले आहेत. त्यामुळे त्यांना जाहीर झालेला पुरस्कार हा खर्‍या अर्थाने योग्य आहे.
– गोरक्ष रहाणे (दिव्यांग बांधव, चंदनापुरी)

Visits: 188 Today: 1 Total: 2120961

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *