घारगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात हरीण ठार

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एक ते दीड वर्षीय वयाचे हरीण ठार झाले आहे. सदर घटना बुधवारी (ता.6) पहाटे घडली आहे.

याबाबत माहिती अशी की, घारगाव शिवारातील खंडोबाच्या मंदिरासमोरच असलेल्या माळरानाच्या कडेला हरीण मृतावस्थेत होते. या घटनेची माहिती समजताच वन परिमंडळ अधिकारी रामदास थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक दिलीप बहिरट यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या मृत हरणाला पोत्यात घातले. त्यानंतर कोठे बुद्रुक रोपवाटिकेत आणून शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान घारगाव शिवारात पहिल्यांदाच हरीण आढळून आले असून त्याचीही बिबट्याने शिकार केली आहे.

Visits: 130 Today: 1 Total: 1098602
