शनिशिंगणापूर ग्रामपंचायत पंधरा वर्षानंतर बिनविरोध मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची शिष्टाई
![]()
नायक वृत्तसेवा, नेवासा
मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी विश्वस्त बापूसाहेब शेटे यांच्या नेृतत्वाखाली शनिशिंगणापूर ग्रामपंचायत पंधरा वर्षानंतर बिनविरोध झाली आहे.

शनिशिंगणापूर येथे असलेल्या दोन राजकीय गटामुळे देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतमध्ये नेहमीच राजकीय कलगीतुरा रंगायचा. याचा अनेक विकास कामांवर परीणाम होत होता. मंत्री गडाख यांनी शनैश्वर देवस्थानकरिता गावातील मूळ रहिवासीच विश्वस्त होणार, अशी घटना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावतीने पूर्ववत करुन आणल्याने गावातील सर्व विरोधक एका छताखाली आले आहेत. यामध्ये शिवाजी जगन्नाथ शेटे, कल्पना शरद देठे, कुसुम जालिंदर दरंदले, बेबी भीमराज बानकर, पुष्पा बाळासाहेब बानकर, स्वप्नील बाळासाहेब बोरुडे, वैशाली रमेश शेटे, बाळासाहेब बापूसाहेब कुर्हाट, राजेंद्र तुकाराम शेटे या सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. देवस्थान ट्रस्टसाठी ग्रामपंचायत गटाने अर्ज भरले नव्हते. तसेच ग्रामपंचायतसाठी देवस्थान विश्वस्त गटाने अर्ज भरले नव्हते. या ग्रामपंचायतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.

मंत्री गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान ट्रस्टचे काम चांगले असून, त्यांनी ग्रामपंचायत विकास कामात महत्वाचे योगदान दिले आहे, असे मत बापूसाहेब शेटे यांनी व्यक्त केले. तर बाहेरचे राजकारणी दिशाभूल करीत असल्याने आम्ही युवक भरकटलो होतो. गडाख यांच्यामुळे नवीन विश्वस्त सर्वसमावेशक निवडले व ग्रामपंचायतही बिनविरोध झाली आहे, असे नूतन सदस्य बाळासाहेब कुर्हाट यांनी सांगितले.

