संगमनेर तालुक्यात ग्रामपंचायत बिनविरोध निवडणुकीचे वारे
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व असून राज्यभराप्रमाणे गावागावात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र ‘एक तालुका एक परिवार’ या संकल्पनेतून विकासाला साथ देत महसूल मंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमधून बिनविरोध निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.
संगमनेर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या अहमदनगर जिल्ह्यात सर्वात मोठा असून, यामध्ये 94 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारी, 2021 रोजी होऊ घातल्या आहेत. त्यात हा तालुका काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला असल्याने गावागावात महसूल मंत्री थोरातांचे कार्यकर्ते दोन गटांत निवडणूक लढवत असतात. मात्र, विकास कामांना पाठिंबा देत मतभेद व मनभेद निर्माण करण्यापेक्षा एकत्रितपणे निवडणुका बिनविरोध करण्यासाठी गावातील तरुण पिढी आग्रही झाली आहे. त्यानुसार अनेक गावांमधून निवडणुकीचे बिनविरोध निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.