जाणता राजा प्रतिष्ठानचे समाजरत्न पुरस्कार समाजाला दिशादर्शक ः सुनीलगिरी महाराज पुरस्कार सोहळ्यास विविध पक्षीय मान्यवर उपस्थित असल्याने रंगला राजकीय कलगीतुरा
नायक वृत्तसेवा, नेवासा
जाणता राजा प्रतिष्ठानचे पुरस्कार हे समाजाला दिशा देणारे, नि:स्वार्थी काम करणार्यांना प्रेरणा व उमेद देणारे आहेत असे प्रतिपादन महंत सुनीलगिरी महाराज यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठान आयोजित मातोश्री स्व.द्वारकाबाई मारुतराव मोहिटे पाटील यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार्या समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. माजी खासदार तुकाराम गडाख हे कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी होते. तर व्यासपीठावर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे, ज्ञानेश्वरचे संचालक जनार्दन पटारे, सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, भाजप तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, सचिन देसरडा, दिनकर गर्जे, बाळासाहेब भणगे, सयाजी ढवाण, संभाजी माळवदे, अशोक बोरा, तुकाराम काळे, सतीष मुळे, सरपंच मीना जोजार, नामदेव खंडागळे, श्याम पुरनाळे, शरद आरगडे, अशोक टेकणे, नाना टाके, विश्वास काळे, संजय तुपे, अशोक कदम, मनोज पारखे, मानव साळवे, अमोल साळवे, पोपट शेकडे, देविदास पटारे, सोमनाथ शेंडे आदी उपस्थित होते. यावेळी जलमित्र सुखदेव फुलारी, पत्रकार चंद्रकांत दरंदले, डॉ.अविनाश काळे, ज्ञानेश्वर मोटकर, आशा गर्जे, राजेंद्र शेटे, रावसाहेब मगर, रेवणनाथ भिसे, संतोष कदम, वृषाली घोडके, रेवणनाथ पवार यांना समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
याप्रसंगी उल्लेखनीय सामाजिक कामाबद्दल लक्ष्मण मोहिटे यांचा भानसहिवरे ग्रामस्थांच्यावतीने सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ.रेवणनाथ पवार व प्रा.राजेंद्र शेटे यांनी केले. राजेंद्र कीर्तने यांनी आभार मानले. या कार्यक्रमास सर्व पक्षाचे पदाधिकारी हजर असल्याने चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला होता. विशेषतः माजी खासदार तुकाराम गडाख यांनी सगळ्यांचीच फिरकी घेतली.