कोपरगाव मनसेचे जिल्हाधिकार्यांना विविध मागण्यांचे निवेदन
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी आज (सोमवार ता.14) कोपरगाव तालुक्याला येणार्या समस्या जाणून घेण्यासाठी तहसील कार्यालयाला भेट दिली. यावेळी विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी उपस्तिथ होते. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनेही जिल्हाधिकार्यांना शहराच्या विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले.
कोपरगाव शहरातील पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कर्मचार्यांची संख्या वाढ करावी, वाहन खराब असल्यामुळे त्यांना नवीन वाहन द्यावे, तहसील कार्यालयात कोतवाली पदाची भरती करावी, विस्थापितांच्या खोकाशॉपसाठी नियोजन करावे, नगरपालिकेच्या 42 कोटींची पाणी योजनेची चौकशी करावी, आदी मागण्या सदर निवेदनातून करण्यात आलेल्या आहेत. यावेळी मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे, माजी तालुकाध्यक्ष अलीम शहा, उप तालुकाध्यक्ष रघुनाथ मोहिते, उपशहराध्यक्ष विजय सुपेकर, अनिल गाडे, हिंदू सम्राट संघटना संस्थापक व गिताई प्रतिष्ठानचे सचिव नीलेश काकडे, वाहतूक तालुकाध्यक्ष जावेद शेख, युवा नेते नवनाथ मोहिते, विद्यार्थी उपशहराध्यक्ष संजय जाधव, हिंदू सम्राट संघटना उपाध्यक्ष अनिकेत खैरे, अजिंक्य क्लबचे अध्यक्ष विक्रम काकडे आदी मनसैनिक उपस्थित होते.