जोड व्यवसाय करा, पण जमिनी विकू नका ः मेंगाळ

नायक वृत्तसेवा, अकोले
शेंडीमार्गे घाटघरहून मुंबईला जोडणार्या रस्त्यामुळे येणारे पर्यटक आपल्या मार्गे येणार असल्याने घाटघर, शिंगणवाडी, पांजरे उडदावणे या रस्त्यालगत असणार्या जमिनीत जोड व्यवसाय उभारावा. परंतु, जमिनी विकू नका, असे आवाहन ठाकर समाजाचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ मेंगाळ यांनी केले.

अकोले तालुक्यातील उडदावणे येथे ठाकर समाजाच्या समस्या व व्यथा जाणून घेण्यासाठी आयोजित विचारमंथन बैठकीत मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले, समाजाचे संघटन, एकी हीच आपल्या समस्या सोडवू शकते. त्यामुळे सर्वांनी एक रहावे असे आवाहन त्यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते बच्चू गांगड म्हणाले, समाजाच्या समस्या व व्यथा सोडवूनच आपल्याला पुढे जावे लागणार आहे. त्यादृष्टीने संघटनेला काम करावे लागेल. विद्यार्थी नेते मदन पथवे म्हणाले, आदिवासी ठाकर समाजात होणारी जात व सामाजिक घुसखोरी बाबतचे महत्व पटवून देऊन काम करीत आहे. सोमा उघडे यांनी चाळीसगाव डांगण भागातील ठाकर समाज हा आपल्या पाठिशी आहे असे सांगितले. डॉ.भाऊराव उघडे, तुळशीराम कातोरे, दीपक पथवे, भरत मेंगाळ, पांडुरंग पथवे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक संजय मेंगाळ तर सूत्रसंचालन राहुल गावंडे यांनी केले. यावेळी उपसरपंच शांताराम गिर्हे, शांताराम मेंगाळ, बाळासाहेब मेंगाळ, अशोक पोकळे, देविदास पोकळे, संजय गिर्हे, विलास आगिवले, अंकुश गांगड, गोकुळ गिर्हे, गोविंद हिंदोळे, रामा घोगरे, भाऊ गिर्हे, लताबाई मेंगाळ आदी उपस्थित होते.

