राहुरीमध्ये विवाहितांच्या छळाबद्दल गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील दोन विवाहितांनी सासरच्या मंडळींविरुद्ध पोलिसांत धाव घेतली आहे. सासरी नांदताना माहेराहून पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी राहुरी पोलिसांत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मयुरी राहुल पाळंदे (वय 20, रा.राहुरी) हिने फिर्यादीत म्हंटले आहे की, माहेरून साडेतीन लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी सासरी छळ झाला. याप्रकरणी राहुल राजू पाळंदे (पती), संगीता राजू पाळंदे (सासू), राजू भास्कर पाळंदे (सासरे), रोहित राजू पाळंदे (दीर, सर्व रा.चेंबुर, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसर्‍या प्रकरणात मालती सोमनाथ गारे (रा.कणगर) हिने फिर्याद दिली आहे. त्यानुसार चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी सासरी छळ होत होता. याप्रकरणी सोमनाथ सीताराम गारे (पती), सगुणा सीताराम गारे (सासू), सीताराम रामू गारे (सासरे, सर्व रा.खेड, जि.नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

Visits: 231 Today: 1 Total: 2121533

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *