मांजरी येथे रस्त्याच्या वादातून तिघांना बेदम मारहाण राहुरी पोलिसांत बारा जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल


नायक वृत्तसेवा, राहुरी
न्यायालयाचा मनाई हुकूम असताना देखील रस्ता करण्याचे काम सुरू केले. या कामाला विरोध केला असता नवनाथ विटनोर तसेच त्यांची आई व भाऊ यांना लाथाबुक्क्यांनी, लोखंडी पाईप व कुर्‍हाडीने मारहाण केल्याची घटना मांजरी (ता.राहुरी) येथे घडली आहे.

मांजरी येथील नवनाथ बापू विटनोर यांच्या शेजारी अण्णासाहेब भागवत विटनोर, अशोक भागवत विटनोर, रावसाहेब भागवत विटनोर हे वास्तव्यास आहेत. त्यांच्यात वहीवाटीच्या कारणावरून नेहमी वाद होत असतो. सदर वहिवाटीचा वाद न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाचा मनाई हूकूम असताना देखील विटनोर यांच्या गट क्रमांक 625 मधील शेतामध्ये वरील तिघांनी येऊन रस्ता तयार करण्यास सुरुवात केली. तेव्हा नवनाथ विटनोर, त्यांचा भाऊ ज्ञानदीप व आई आसराबाई हे त्यांना समजावून सांगत होते की, रस्त्याचा वाद न्यायालयात चालूू आहे. तुम्ही येथून रस्ता करू नका.

त्यानंतर वरील तिघांनी नवनाथ विटनोर त्यांचा भाऊ व आई यांना लाथाबुक्क्यांनी, लोखंडी पाईप व कुर्‍हाडीने मारहाण केली. तसेच परत आम्हांला आडवे आलात तर येथेच गाडून टाकू, अशी जीवे मारण्याची धमकी देत तेथून निघून गेले. या घटनेत आसराबाई यांच्या गळ्यातील डोरले गहाळ झाले आहे. याप्रकरणी नवनाथ बापू विटनोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अण्णासाहेब भागवत विटनोर, अमोल अण्णासाहेब विटनोर, अशोक भागवत विटनोर, अप्पासाहेब रावसाहेब विटनोर, बाबासाहेब रावसाहेब विटनोर, पोपट अशोक विटनोर, रावसाहेब भागवत विटनोर, संतोष अशोक विटनोर, मैनाबाई अण्णासाहेब विटनोर, निखील बाबासाहेब विटनोर, रंजना अप्पासाहेब विटनोर, लताबाई बाबासाहेब विटनोर अशा बारा जणांवर गुरनं. 640/2023 भादंवि कलम 324, 323, 427, 504, 506, 143, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Visits: 173 Today: 1 Total: 2166977

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *