संगमनेर शहरात विवाहितेचा विनयभंग

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील अभंग मळा येथे किरकोळ कारणावरून एका विवाहित महिलेला राहुल गुडवाल (पूर्ण नाव माहीत नाही) याने मारहाण करून तिचा विनयभंग केला आहे. सदर घटना बुधवारी (ता.9) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील अभंग मळा येथील विवाहित महिलेचा मुलगा अंगणात खेळत होता. जवळच राहणार्‍या राहुल गुडवाल याने मुलास मारहाण केली. मुलाला का मारहाण केली याचा जाब विचारण्यासाठी गेली असता गुडवाल याने विवाहितेला मारहाण करत तिचा विनयभंग केला. याबाबत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी राहुल गुडवाल याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 2035/2020 भादंवि कलम 354, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्सटेबल बी.बी.देशमुख हे करत आहे.

Visits: 148 Today: 2 Total: 1868265

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *