कोपरगाव बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
येथील बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिली आहे.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा पंचवार्षि कालावधी 1 नोव्हेंबर, 2020 ला संपुष्टात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनिमय) अधिनियम 1963 चे कलम 15 अ, एकमधील अ, ब, दोन, तीन, चारमधील तरतुदींनुसार व वाचा क्रमांक तीननुसार प्रशासकाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे बाजार समितीचे दैनंदिन कामकाज पाहण्याकरिता प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक एन. जी. ठोंबळ यांच्या नियुक्तीचा आदेश जिल्हा उपनिबंधक आहेर यांनी पारित केला आहे.

Visits: 155 Today: 1 Total: 2123893

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *