सोमवारी संगमनेरातील सात जणांचा कोविडने घेतला बळी! घुलेवाडीत कोविडचा उद्रेक; एकाचवेळी पंच्याहत्तर बाधित, शहरातील ओहोटी मात्र आजही कायम..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील कोविड संक्रमणाची गती आणि त्याची दाहकता कायम असून सोमवारी तालुक्यातील सात जणांचे बळी गेले. एकाच दिवशी इतक्या संख्येने बळी जाण्याची संगमनेरातील ही पहिलीच घटना होती. त्यामुळे पार्थिवांनाही अग्निडाग देण्यासाठी प्रतिक्षा करावी लागल्याचे भयानक चित्र सोमवारी दिसले. त्यातच स्मशानात जागा अपूरी पडल्याने पुणे-नाशिक महामार्गावरील जून्या पुलाच्या खालच्या जागेचा वापर करावा लागला. रोज वाढणारी रुग्णसंख्या आणि त्यात मृत्यूदरात झालेली वाढ इतके भयानक चित्र निर्माण होवूनही संगमनेरातील गर्दी हटण्याचे नाव घेत नसल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. त्यातच आज तालुक्यातील 139 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात शहरातील अवघ्या सोळा जणांचा समावेश आहे. आजच्या अहवालातून घुलेवाडीत कोविडचा उद्रेक झाल्याचे समोर आले असून या भागातून तब्बल 75 रुग्ण समोर आले आहेत. तालुक्यातील रुग्णसंख्येत पडलेल्या आजच्या भरीने तालुका आता 12 हजार 417 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 849 असून आज 264 जणांना घरीही सोडण्यात आले आहे.


राज्यात परतलेल्या कोविडने सर्वत्र हाहाकार माजवला असून दररोज मोठ्या संख्येने रुग्णसमोर येत असल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडल्यागत स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच रुग्णांना आवश्यक असलेल्या ऑक्सिजनसह रेमडेसिवीर लशींचाही मोठा तुटवडा असल्याने राज्यभर रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरु आहे. सोमवारी घुलेवाडीच्या शासकीय कोविड आरोग्य केंद्रासह शहरातील अन्य रुग्णालयांमध्ये सात जणांचा कोविडने मृत्यू झाला. यात शहरातील एका वकील महिलेचाही समावेश आहे. एकाच दिवशी इतक्या संख्येने रुग्ण दगावण्याचा गेल्या 13 महिन्यातील हा पहिलाच प्रसंग असल्याने संगमनेरच्या अमरधाममध्ये पार्थिवांनाही अग्निडाग मिळवण्यासाठी प्रतिक्षा करण्याची पाळी आली होती. त्यातच एकाचवेळी इतक्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था नसल्याने अखेर पुणे-नाशिक महामार्गावरील जून्या पुलाच्या खालच्या भागातच जवळपास पाच पार्थिवांवर अग्निसंस्कार करावे लागले.


गेल्या चार/पाच दिवसांत तालुक्याच्या ग्रामीणभागात रुग्णसंख्येचा वेग वाढल्याचे दिसत आहे, मात्र त्याचवेळी शहरी रुग्णसंख्येला ओहोटी लागल्याचे समाधानकारक चित्रही दिसत आहे. आजही शासकीय प्रयोगशाळेचे 88, खासगी प्रयोगशाळेचे 27 व रॅपीड अँटीजेनद्वारा 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आजच्या अहवालातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे घुलेवाडी परिसरातील तब्बल 75 जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे एकाचवेळी समोर आले आहे. या वृत्ताने केवळ घुलेवाडीच नव्हेतर संपूर्ण तालुक्यातही खळबळ उडाली असून आजवर एकाच ठिकाणाहून इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण समोर येण्याचा कदाचित हा पहिलाच प्रसंग आहे.


आजच्या अहवालातून संगमनेर शहरातील माळीवाडा येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, विद्यानगर परिसरातील 86 वर्षीय वयोवृद्ध नागरिक, इंदिरानगर मधील 50 वर्षीय महिलेसह 24 वर्षीय तरुण, जनतानगर मधील 55 वर्षीय इसमासह 35 वर्षीय तरुण आणि 55 व 30 वर्षीय महिला, मालदाड रोडवरील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पंपींग स्टेशन परिसरातील 48 वर्षीय महिला, अभिनव नगरमधील 35 वर्षीय महिलेसह 14 वर्षीय बालिका व संगमनेर असा पत्ता असलेल्या 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 52 वर्षीय इसम, 27 वर्षीय तरुण आणि 37 व 29 वर्षीय महिला संक्रमित झाल्या आहेत. तर ग्रामीण भागातील चणेगाव येथील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 50, 39 व 35 महिला, 14 वर्षीय मुलगा व 12 वर्षीय मुलगी,


चिंचपूर येथील 76 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, हिवरगाव आंबरे येथील 43 वर्षीय महिला, लोहारे येथील 22 वर्षीय तरुण, कासारे येथील 55 वर्षीय इसमासह 19 वर्षीय तरुण, कौठे धांदरफळ येथील 40 वर्षीय तरुण, निमोण येथील 75 वर्षीय महिला, पिंप्री लौकीतील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व 60 वर्षीय महिला, ढोलेवाडीतील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, राजापूर येथील 72 वर्षीय महिलेसह एक वर्षीय बालिका, सांगवी येथील 23 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथील 27 वर्षीय तरुण, वडझरी खुर्द येथील 38 व 34 वर्षीय तरुण, वडगाव पान येथील 48 वर्षीय तरुणासह आरा वर्षीय मुलगा, जवळे कडलग येथील 33 वर्षीय महिला, सुकेवाडीतील 32 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 30 वर्षीय तरुण, चिंचोली गुरव येथील 4 वर्षीय बालक, आंबी खालसा येथील 22 वर्षीय तरुण, खंदरमाळ येथील 70 वर्षीय महिला,


पडाळणे येथील 51 वर्षीय इसम, देवकौठे येथील 21 वर्षीय तरुण, मणेगाव येथील 35 वर्षीय तरुण, नान्नज दुमाला येथील 60 वर्षीय महिला, कौठे कमळेश्‍वर येथील 29 वर्षीय महिला, निळवंडे येथील 44 वर्षीय इसमासह 55 व 39 वर्षीय महिला, माळवाडी येथील 22 वर्षीय महिलेसह सहा वर्षीय वर्षीय बालिका व दोन वर्षीय बालक, आभाळवाडी येथील 32 वर्षीय तरुण, कुरकुटवाडीतील 31 वर्षीय महिला, बोटा येथील 25 वर्षीय महिला, दाढ खुर्द मधील 65 व 22 वर्षीय महिला, दाढ बु. मधील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, तर घुलेवाडीत आज कोविडचा अक्षरशः उद्रेक झाल्याचे पहायला मिळाले.


घुलेवाडीतील 70, 68, 67 व 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 56, 52, 49 व 43 वर्षीय इसम, 42 वर्षीय दोघे, 41, 40, 38 वर्षीय तिघे, 37, 36 वर्षीय चौघे, 35 वर्षीय दोघे, 34 वर्षीय दोघे, 33, 31, 30, 29, 27 वर्षीय दोघे, 26, 25, 24 वर्षीय तिघे, 22, 21, 19, 18 वर्षीय दोघे, 17 व 15 वर्षीय तरुण, तसेच 65, 60, 59, 52, 48, 46, 45 वर्षीय तिघी, 43, 42, 41, 40 वर्षीय चौघी, 38, 35 वर्षीय तिघी, 32, 31, 30, 28, 23 व 21 वर्षीय तिन महिला, 17 वर्षीय तरुणी व 14, 9, 8 व सहा वर्षीय मुली अशा एकूण 75 जणांसह तालुक्यातील 139 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या आता 12 हजार 417 झाली आहे. तालुक्यात सध्या 1 हजार 849 रुग्ण सक्रीय असून आज 264 जणांना उपचारांती घरी सोडण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज 2 हजार 795 रुग्ण आढळले. त्यात अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 650, नगर ग्रामीणमधील 282, श्रीरामपूर 229, राहाता 216, नेवासा 184, कर्जत 160, राहुरी 158, पारनेर 145, संगमनेर 139, कोपरगाव 115, शेवगाव 108, श्रीगोंदा 105, पाथर्डी 94, अकोले 90, इतर जिल्ह्यातील 71, जामखेड 27, भिंगार लष्करी परिसर 21 व इतर राज्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 1 लाख 42 हजार 153 झाली असून आत्तापर्यंत जिल्ह्यातील 1 लाख 19 हजार 241 जणांनी उपचार पूर्ण करुन घर गाठले आहे. सध्या जिल्ह्यातील 21 हजार 277 रुग्णांवर उपचार सुरु असून आजवर जिल्ह्यातील 1 हजार 635 रुग्णांचा कोविडने बळी घेतला आहे. आज दिवसभरात जिल्ह्यातील 23 जणांचा बळी गेला आहे.

Visits: 167 Today: 2 Total: 1114191

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *