भाजपच्या मंडल प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नायक वृत्तसेवा, नेवासा
महाराष्ट्र प्रशिक्षण विभागाच्यावतीने नेवासाफाटा येथे भाजपच्यावतीने आयोजित मंडल प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सामाजिक अंतराचे पालन करत झालेल्या प्रशिक्षण वर्गामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

नेवासाफाटा येथील यश सांस्कृतिक भवनमध्ये झालेल्या मंडल प्रशिक्षण वर्गाच्या प्रसंगी भाजपचे महाराष्ट्र संघटन मंत्री विजय पुराणिक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा.भानुदास बेरड, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे, शेतकरी नेते दिलीप पवार, माजी शिक्षक नामदेव खंडागळे आदी उपस्थित होते. जिल्हा संघटन सरचिटणीस व नेवासा तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. आगामी काळात करण्यात येणारी पक्षबांधणी, पुढील निवडणुकांच्या तसेच सामाजिक उपक्रमाच्या दृष्टीने भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व्हावे म्हणून या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले असल्याचे दिनकर यांनी सांगितले. दरम्यान, लॉकडाऊन काळात भाजपच्यावतीने केलेल्या सेवा कार्याच्या ई-पुस्तिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Visits: 130 Today: 1 Total: 1958923

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *