विनयभंग प्रकरणी एकाविरोधात गुन्हा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील घुलेवाडी येथील एका तेवीसवर्षीय तरुणीच्या मोबाईलवर व्हाट्सअ‍ॅपवर संदेश पाठवून तिला लज्जा उत्पन्न होईल असे बोलून धमकी दिल्या प्रकरणी शहर पोलिसांनी मालदाड येथील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, घुलेवाडी येथील एका तेवीसवर्षीय तरुणीला आरोपी संकेत यादव नवले हा 27 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान सतत त्याच्या ताब्यातील मोबाईलवरुन तरुणीला व्हाट्सअ‍ॅपवर संदेश पाठवून लज्जा उत्पन्न होईल असे बोलून धमकी दिली. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी संकेत नवले याच्याविरोधात गुरनं.2019/2020 भादंवि कलम 354, 354 ड (2), 507 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार फटांगरे हे करत आहे.

 

Visits: 178 Today: 1 Total: 2129922

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *