वडासह सर्व देववृक्षांचे संवर्धन करा ः तांबे
![]()
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दंडकारण्य अभियानांतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदा वटसावित्री पौर्णिमेनिमित्त संगमनेर तालुक्यात अकराशे अकरा वटवृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. वड, पिंपळ, उंबर यांसह सर्व देववृक्ष हे सर्वाधिक ऑक्सिजन देणारे असल्याने त्यांचे नागरिकांनी संवर्धन करावे असे आवाहन नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी केले आहे.

संगमनेर नगरपरिषदेच्यावतीने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत शहरात विविध ठिकाणी वृक्षांचे रोपण व पूजन करण्यात आले. तसेच तालुक्यात खांडगाव, कौठे कमळेश्वर, चिखली, निळवंडे येथेही वड पूजन व वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी सुनंदा दिघे, स्मिता बांगर, निर्मला गुंजाळ, अर्चना बालोडे, सौदामिनी कान्होरे, राधाबाई गुंजाळ, मुक्ताबाई पवार, मनीषा उकिरडे, सरपंच मीरा भडांगे, सोनाली जोंधळे, सुनीता मुसळे, गायत्री जोंधळे, नगरसेवक गजेंद्र अभंग, प्रा. बाबा खरात, बाळासाहेब उंबरकर, विलास हासे, बाळासाहेब पवार, रुपाली औटी, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
