नाभिक महामंडळाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी जाधव

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नाभिक महामंडळाच्या पदाधिकार्‍यांची बैठक संगमनेर येथे नुकतीच पार पडली. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विकास मदने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दक्षिण जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत व उत्तर जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये संगमनेर तालुकाध्यक्ष बाबासाहेब जाधव यांनी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी प्रियंका जाधव यांच्या नावाची सूचना मांडली. त्यावर सर्व पदाधिकार्‍यांचे एकमत होऊन प्रदेशाध्यक्ष दत्ता अनारसे यांचेकडे पाठवत सर्वानुमते महिला जिल्हाध्यक्ष पदाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या निवडीचे स्वागत सर्व नाभिक बांधवांमधून होत आहे.

सदर निवडीचे स्वागत कार्याध्यक्ष जयेश वाकचौरे, उपाध्यक्ष बाळासाहेब व्यवहारे, सचिव राजेंद्र राऊत, उपाध्यक्ष सुरेश कदम, जिल्हा प्रवक्ता सहदेव जाधव, जिल्हा सरचिटणीस प्रसाद कोरडे, कैलास भागवत, बाळासाहेब वाकचौरे, बाळासाहेब मदने, किशोर दुधाडे, सचिन खजिनदार, सचिन जाधव, काका वाघमारे, गणेश विश्वासराव, प्रशांत विश्वासराव, संगमनेर शहराध्यक्ष रमेश सस्कर, सुजीत कोरडे, महेश कोरडे, प्रदीप बोर्डे, वाल्मिक बिडवे, किरण चौधरी, अमोल तुपे, संगमनेर युवक अध्यक्ष वैभव बिडवे, संजय बिडवे, कचरु भालेराव, विठ्ठल कडूस्कर, अशोक सस्कर, सुधीर भालेकर, अनिल सस्कर, श्याम बिडवे, शरद कोल्हाळ, प्रशांत कदम, रावसाहेब वाघ, खंडू वाघ, दत्ता जाधव, विजय जाधव, भीमराज जाधव, अमोल जाधव, नीलेश कोकाटे, धर्मा जगताप, भाऊसाहेब बोर्‍हाडे, सुखदेव बोर्‍हाडे, सागर मदने, सावळेराम मदने, रणजीत जाधव, सोमनाथ जाधव, गोरख शिंदे, अंगद बिडवे, गणेश भोसले, योगेश पंडीत, गणेश कणसे, भारत शिंदे, भावेश बिडवे, भाऊ बिडवे, बाबा कदम, संतोष कुटे, नितीन कोल्हाळ, राजू बिडवे, दर्शन शिंदे, भागचंद राऊत, वसंत मदने, सोमनाथ मदने आदिंनी केले आहे.

Visits: 171 Today: 1 Total: 1951575

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *