अकोले तालुका काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदी कुमकर

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील वीरगाव देवराम शंकर कुमकर यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अकोले तालुका कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नुकतेच तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे.

देवराम कुमकर हे अनेक वर्षांपासून काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून सक्रीय आहेत. पक्षाच्यावतीने झालेल्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. पक्षाने दखल घेऊन कोषाध्यक्षपदावर केलेल्या निवडीमुळे काम करण्याचा अधिक ऊर्जा मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. नियुक्ती पत्र प्रदान करतेवेळी विजयसिंह थोरात, माणिक अस्वले, रेवणनाथ देशमुख, अशोक धात्रक आदिंसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. सदर निवडीचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत करुन अभिनंदन केले आहे.

 

Visits: 237 Today: 1 Total: 2123327

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *