विमा कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
बनावट दस्तावेज तयार करुन खोटा वाहन अपघात दाखवून न्यायालय व विमा कंपनीची फसवणूक केल्या प्रकरणी कोपरगाव पोलिसांनी नुकताच दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नंदकुमार छोटुलाल खिच्ची (रा.सावळीविहीर, ता.राहाता) व अ‍ॅड.मंगला राजेश कोठारी (रा.नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी फिर्याद दिली आहे. खच्ची व कोठारी यांनी राजेंद्र जयवंत वाघ व सुरेश जयवंत वाघ (रा.बेट, ता.कोपरगाव) यांच्या घरी जाऊन विम्याचे पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूचा दाखला घेऊन वकीलपत्रावर व इतर कागदपत्रांवर सह्या घेतल्या. नंतर वाहनाचा खोटा अपघात दाखवून बनावट दस्तावेज तयार करुन मोटार अपघात दावा दाखल केला. न्यायालयात दाखल केलेला दावा व पोलीस ठाण्याची फिर्याद यामध्ये तफावत आढळल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Visits: 15 Today: 1 Total: 115006

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *