नेवाशामध्ये ग्रामसेवकांचे काळ्या फिती लावून कामकाज

नायक वृत्तसेवा, नेवासा
राज्य कर्मचार्यांच्या संपाला पाठिंबा देत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्या नेवासा शाखेच्यावतीने ग्रामसेवकांनी काळ्या फिती लावून कामकाज केले असल्याची माहिती संघाचे मार्गदर्शक दादासाहेब डौले व अध्यक्ष सुनील काळे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्थेचे मार्गदर्शक दादासाहेब डौले म्हणाले, या संपाला पाठिंबा देण्याबाबत नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, गटविकास अधिकारी शेखर शेलार यांना निवेदन देऊन कल्पना देण्यात आली. केंद्र सरकारने कर्मचारी व कामगार धोरणांबाबत देशातील कर्मचारी व कामगार यांच्या विविध संघटनांनी 26/11 रोजी संप पुकारलेला असल्याने या संपास संघाचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी (कंत्राटी वगळून) सहभागी झाले होते. तसेच निषेध म्हणून काळ्या फिती लावून दैनंदिन काम कामकाज करण्यात आले आहे. या संपामध्ये अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुदाम बनसोडे, रावसाहेब डौले, संचालक पोपट वरखडे, अशोक उगले, दिलीप शेळके, अण्णासाहेब डेंगळे, अनुसुयाकुमार उन्हाळे, राजेंद्र मुसमाडे, ज्ञानदेव शिंदे यांसह ग्रामसेवक सहभागी झाले होते.

