‘जिजाऊ ब्रिगेड’ महिलांची समतावादी संघटना ः डॉ.पानसरे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिजाऊ ब्रिगेड ही महिलांची समतावादी विचारांची संघटना असल्याची प्रतिक्रिया जिजाऊ ब्रिगेडच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्षा डॉक्टर दीपाली पानसरे यांनी दिली आहे. निवडीनंतर प्रथमच त्या दैनिक नायकशी बोलत होत्या.

गेल्या दोन वर्षांपासून आपण जिजाऊ ब्रिगेडचे काम समर्थपणे पार पाडत आहे. त्यासाठी माझ्या सर्व सहकारी महिलांचे मला मोठे सहकार्य मिळत आहे. या वर्षीच्या नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांच्या व्यक्तिरेखा साकारत त्यांचे आचार-विचार जाणून घेत या प्रेरणादायी महिलांची ओळख महिलावर्गाला मी करून देण्यात यशस्वी झाले असे देखील डॉक्टर पानसरे यांनी सांगितले. अकोले, श्रीरामपूर, नेवासा व कोपरगाव या तालुक्यांमध्ये देखील नवीन कार्यकारिणी तयार करून जिजाऊ ब्रिगेडच्या शाखा सुरु करणार आहे. महिला सक्षमीकरण करून नारी अबला नसून सबला आहे हे दाखविण्याचा मी प्रयत्न करणार असून, महिलांवर होणारे अन्याय-अत्याचार रोखण्यासाठी तळागाळातील महिलांच्या पाठिशी जिजाऊ ब्रिगेड भक्कम उभी राहणार आहे. ज्या महिलांना ब्रिगेडच्या या कार्यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी तात्काळ संपर्क करावा असे आवाहन देखील नवनिर्वाचित उत्तर नगर जिल्हाध्यक्षा डॉक्टर दीपाली पानसरे यांनी केले आहे.

 

Visits: 115 Today: 2 Total: 1110856

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *