कोपरगाव तालुका व शहर पोलीस ठाण्यासाठी अनेकांची ‘फिल्डिंग’

कोपरगाव तालुका व शहर पोलीस ठाण्यासाठी अनेकांची ‘फिल्डिंग’
अक्षय काळे, कोपरगाव
कोपरगाव तालुका व शहर पोलीस ठाण्याला सध्या पोलीस निरीक्षक नसल्याने दोन्ही ठिकाणी कोण नवीन अधिकारी येणार याबाबत कोपरगावकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कोपरगावमधून गोदावरी नदी वाहत असल्याने वाळू तस्करी, गुन्हेगारी, अवैध धंदे, राजकीय वैमनस्यातून वादावादी या प्रकरणामुळे कोपरगाव नेहमी चर्चेत असते. नुकतीच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांची अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) प्रमुखपदी बदली झाल्याने त्यांच्या जागी कोण नवीन अधिकारी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचीही बदली झाल्याने ही जागा रिक्त असून या खुर्चीवर कोण बसणार याकडेही सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. तालुका अथवा शहर पोलीस ठाणे मिळावे यासाठी अनेक पोलीस अधिकार्‍यांनी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. अनेकांनी वरीष्ठ पातळीवरून वजन वापरुन ‘फिल्डिंग’ लावण्यास जोरदारपणे सुरुवात केली आहे. दरम्यान, शहर पोलीस निरीक्षक पदावर गोविंद पवार, यादव पाटील, जगदीश पाटील, मधुकर औटी, राकेश मानगावकर यांसारख्या अनेकांनी आपला कार्यकाळ चांगला गाजवून अनेकांना सरळ केल्याचे अनुभव आहेत. त्याप्रमाणे आता डॅशिंग पोलीस निरीक्षक कोपरगावला मिळेल का? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

अभय परमार यांच्या नावाची जोरदार चर्चा…
दबंग पोलीस निरीक्षक म्हणून चर्चिले जाणारे पोलीस निरीक्षक अभय परमार यांची संगमनेर शहरवरून अहमदनगर नियंत्रण कक्षाला बदली झाली असून त्यांचे चांगले पोलीस ठाणे मिळावे म्हणून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कोपरगावसाठी ते येणार असल्याची जोरदार चर्चा सध्या पोलीस वर्तुळात सुरू आहे.

 

Visits: 11 Today: 2 Total: 115898

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *