युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी सांगळे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात सातत्याने युवकांसाठी विविध योजना राबविणारे संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे व शॅम्प्रो संस्थेचे उपाध्यक्ष अभियंता सुभाष सांगळे यांची अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या उत्तर विभागाच्या कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे.

मुंबई येथे काँग्रेस कार्यालयात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली आहे. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या निवडीचे आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, इंद्रजीत थोरात, रणजीतसिंह देशमुख, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक, रामहरी कातोरे, संपत गोडगे, महेंद्र गोडगे, अविनाश सोनवणे, हौशीराम सोनवणे, भारत मुंगसे, उपसभापती नवनाथ अरगडे, भागवत आरोटे, एकनाथ मुंगसे, सचिन दिघे, बाबजी कांदळकर, बी. आर. चकोर, हरिभाऊ दिघे, नामदेव कहांडळ, निखील पापडेजा, सोमेश्वर दिवटे, राजेंद्र कहांडळ, राजेंद्र मुंगसे, ज्ञानेश्वर मुंगसे, अनिल गाजरे यांसह विविध पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

 

Visits: 147 Today: 1 Total: 1953309

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *