एकविरा फाउंडेशनकडून महिलांना राखी बनविण्याचे प्रशिक्षण संगमनेर तालुक्यातील दोन दिवसीय कार्यशाळेस उत्स्फूर्त सहभाग


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सबलीकरणाचे कार्य हाती घेतलेल्या एकविरा फाउंडेशनच्यावतीने संगमनेर तालुक्यातील बचत गटातील महिलांना दोन दिवसांत विविध गावांमध्ये जाऊन राखी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये 18 गावांमधील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

एकविरा फाउंडेशनच्यावतीने संगमनेर तालुक्यातील देवकौठे, चिंचोली गुरव, कोल्हेवाडी, पिंपळगाव, खराडी, रायते, वाघापूर, जोरवे, आंबी खालसा, घुलेवाडी, जांभूळवाडी यांच्यासह 18 गावांमध्ये बचत गटाच्या महिलांना राखी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी प्रकल्प प्रमुख डॉ. वृषाली साबळे, ज्योती थोरात, गायत्री थोरात, श्रद्धा कढणे, मयुरी थोरात, ऐश्वर्या वाकचौरे, पूजा थोरात, पूजा गाडेकर, प्रणाली राऊत, डॉ. सुरभी आसोपा, डॉ. विशाखा पाचोरे, मिताली भडांगे, आदिश्री झवर, इशिता मेहता, सुरभी मोरे, प्राजक्ता घुले, शिल्पा गुंजाळ आदिंनी सहभाग घेतला.

अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनविल्या जाणार्‍या या राख्या एकविरा फाउंडेशन पुन्हा विकत घेणार असून त्या भारतीय सीमेवर रक्षण करणार्‍या सैनिकांना पाठवल्या जाणार आहे. या अभिनव उपक्रमाबाबत डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे व दुर्गा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी रक्षाबंधनानिमित्त सीमेवर लढणार्‍या सैनिकांना राख्या पाठवल्या जातात. एकविरा फाउंडेशनच्यावतीने यावर्षी गावोगावी प्रशिक्षण देऊन या राख्या तयार करून बचत गटाच्या माध्यमातून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच यातील राख्या या सीमेवर सैनिकांनाही पाठविल्या जाणार आहेत. यावेळी नाशिक येथील प्रशिक्षक रुचिता चांडक यांनीही महिलांना मार्गदर्शन केले.

Visits: 99 Today: 1 Total: 1112200

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *