‘गाठी ऋणानुबंधाच्या’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन

‘गाठी ऋणानुबंधाच्या’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन
नायक वृत्तसेवा, अकोले
येथील ‘मिनर्व्हा प्रतिष्ठान’च्यावतीने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रांबाबत विशेष अभ्यास व योगदान असलेले शेतकर्‍यांचे ज्येष्ठ नेते आणि अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकर नवले यांच्या लेखणीतून साकारलेले ‘गाठी ऋणानुबंधाच्या’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवारी (ता.23) होणार आहे.

ज्येष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे यांच्या हस्ते तसेच विधान परिषद सदस्य आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रकाशन सोहळा अभिनव संकुलात पार पडणार आहे. या कार्यक्रमास साध्वी प्रितीसुधाजी स्कूलचे संस्थापक इंद्रभान डांगे आणि लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक सुरेश कोते हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मिनर्व्हा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी प्राचार्य रमेशचंद्र खांडगे व सचिव डॉ.जयश्री देशमुख यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सूचित केलेल्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडणार असल्याचेही आयोजकांनी नमूद केले आहे.

 

Visits: 187 Today: 1 Total: 2123010

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *