शहर पोलिसांचा मदिनानगरमधील कत्तलखान्यावर छापा
शहर पोलिसांचा मदिनानगरमधील कत्तलखान्यावर छापा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मदिनानगर येथील अवैध कत्तलखान्यावर शुक्रवारी (ता.20) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पथकाने छापा टाकला असता 4 हजार रुपये किंमतीचे गोवंशाचे मांस आणि 50 हजार रुपये किंमतीचे तीन बैल आणि दोन गायी असा एकूण 54 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. या प्रकरणी एका इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, शहरातील मदिनानगर येथे निसार अहमद कुरेशी हा एका पत्र्याचे शेडमध्ये चोरून गोवंश जनावरांची कत्तल करत असल्याची बातमी मिळाली. त्या अनुषंगाने शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पोलीस नाईक महाजन, पो.हे.कॉ.डोंगरे, कॉ.गाडेकर, कॉ.धुमाळ यांच्या पथकाने सरकारी वाहनाने सदर ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी निसार कुरेशीकडे 4 हजार रुपये किंमतीचे 20 किलो गोमांस आणि 50 हजार रुपये किंमतीचे 3 बैल व 2 गायी असा एकूण 54 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी पो. कॉ. प्रमोद गाडेकर यांचे फिर्यादीवरून त्याच्याविरुद्व गु.र.नं.2003/2020 प्राणी सरंक्षण कायदा कलम 1995 चे सुधारित कलम 2015 चे कलम 5 (ब) 5 (क) 5 (अ) 1, 9 व प्राण्यांना निर्दयतेने वागणूक कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सलीम शेख हे करीत आहे.

