राहुरीतील अवघ्या पाच वाळू घाटांच्या लिलावांची प्रक्रिया सुरू

राहुरीतील अवघ्या पाच वाळू घाटांच्या लिलावांची प्रक्रिया सुरू
तालुक्यातील 50 पैकी 45 ठिकाणच्या ग्रामस्थांचा लिलावास विरोध
नायक वृत्तसेवा, राहुरी
जिल्ह्यातील मुळा, प्रवरा, गोदावरी या मोठ्या नदीपात्रांतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जातो. यामध्ये राहुरी तालुक्यात 50 पैकी 45 ठिकाणी ग्रामस्थांनी वाळू घाटांच्या लिलावाला विरोध केला आहे. तर उर्वरित पाच ठिकाणी महसूल खात्याने वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे.

मुळा नदीपात्रातील तीन व प्रवरा नदीपात्रातील दोन ठिकाणी वाळू घाटांमध्ये प्रस्तावित वाळू उत्खननबाबत पर्यावरण विषयक जाहीर जनसुनावणी झाली. ग्रामस्थांचा विरोध नसल्याने या पाच ठिकाणी वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा प्रशासनाला राहुरी तालुक्यातील पाच ठिकाणी वाळू घाटांच्या लिलावासाठी 19 हजार 334 ब्रास वाळू उपलब्ध होणार आहे. त्यातून महसूल विभागाला 7 कोटी 20 लाख 73 हजार रुपये रॉयल्टी मिळणे अपेक्षित आहे. जानेवारी 2021 मध्ये वाळू घाटांचे जाहीर लिलाव होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी वाळू लिलावाला कमी प्रतिसाद मिळाला. तरी, राहुरी तालुक्यातील महसूलची वसुली शंभर टक्केपेक्षा जास्त झाली. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार्‍या वाळू लिलावावर सर्वांचे लक्ष वेधले आहे.


प्रस्तावित लिलाव
गाव नदीपात्र ब्रास रॉयल्टी
राहुरी खुर्द      मुळा  1,272    47 लाख 40 हजार
पिंपरी वळण/चंडकापूर,   मुळा   1,074     40 लाख 20 हजार
वळण    मुळा     8,110     3 कोटी 2 लाख 25 हजार
रामपूर   प्रवरा   3,578    1 कोटी 33 लाख 35 हजार
सात्रळ   प्रवरा   5,300    1 कोटी 97 लाख 53 हजार

Visits: 82 Today: 1 Total: 436181

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *