प्राथमिक शिक्षक संघाने राबविलेला गुणगौरव सोहळा प्रेरणादायी ः जोर्वेकर
प्राथमिक शिक्षक संघाने राबविलेला गुणगौरव सोहळा प्रेरणादायी ः जोर्वेकर
संघाकडून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा गुणगौरव
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा संगमनेर या संघटनेच्या संकल्पनेतून संगमनेर तालुक्यात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा गुणगौरव सोहळा पंचायत समितीमधील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सभागृहात नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी बोलताना संगमनेर तालुका प्राथमिक शिक्षक संघ शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यात अग्रेसर असून संघाने राबवलेला गुणगौरव सोहळा हा उपक्रम समाजातील सर्व घटकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत सभापती सुनंदा जोर्वेकर यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी पंचायत समिती उपसभापती नवनाथ अरगडे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस आप्पासाहेब कुल, शिक्षक नेते तथ शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे, शिक्षक बँकेचे अध्यक्ष शरद सुद्रीक, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष साहेबराव अनाप, विस्ताराधिकारी सुवर्णा फटांगरे आदिंसह विविध मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी संगमनेर तालुका प्राथमिक शिक्षक संघाकडून कोरोना राष्ट्रीय आपत्तीकाळात संगमनेर तालुक्याच्या कोरोना नियंत्रणासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांचा ‘कोविड योद्धा’ म्हणून सन्मान करण्यात आला. प्राथमिक शिक्षकांच्या मदतीने शैक्षणिक गुणवत्तेत जिल्ह्यात आघाडी घेतल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांचा तसेच जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सुशीला धुमाळ, पीएचडीधारक संजय गोर्डे, अहमदनगर जिल्हा सर्व्हन्ट सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अरुण जोर्वेकर आणि राज्य आदर्श समितीचा शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल राजू आव्हाड या सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षकांचे सर्व प्रश्न शिक्षक संघाशी वेळोवेळी चर्चा करून सोडवले जातात, असे उपसभापती नवनाथ अरगडे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. शिक्षक संघटनेच्या राजकारणात संगमनेर तालुका राज्याला दिशादर्शक असल्याचे मत राज्य संघाचे सरचिटणीस आप्पासाहेब कुल यांनी व्यक्त केले. तर शिक्षकनेते व जिल्हा संघ व गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे यांनी संघटना आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम केल्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक व शैक्षणिक गुणवत्ता याबाबतीत संगमनेर तालुका जिल्ह्यात अग्रेसर असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सुनील ढेरंगे यांनी केले. तर शिक्षकांच्या सोडवलेल्या व प्रलंबित प्रश्नांविषयी भाऊराव राहिंज यांनी तसेच शिक्षक बँकेबाबत संचालक राजू रहाणे, किसन खेमनर यांनी माहिती दिली. यावेळी पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, संजय गोर्डे यांनी मनोगते व्यक्त केली. सदर कार्यक्रमास बाळासाहेब सरोदे, मच्छिंद्र लोखंडे, राजकुमार साळवे, सयाजी रहाणे, पी.डी.सोनवणे, अशोक गिरी, शंकर भोसले, दिनकर सागर, प्रदीप रहाणे, कार्याध्यक्ष कैलास सहाणे, दिनकर कोकणे, कार्यालयीन चिटणीस निवृत्ती भागवत, प्रकाश शिंदे, विलास दिघे, गीता बाप्ते, रामनाथ कार्ले, एकनाथ लोंढे, उमेश काळे, रामदास ढगे, सुरेश नगरे, अरुण कासार, बाळासाहेब घुले, अभिजीत आगलावे, संदीप पर्बत, जयराम पावसे, गीताराम नवले, सुरेश शिरतार, बाळासाहेब पर्बत, बिलाल सय्यद, सचिन रणाते, प्रेमनाथ डोंगरे, शिवाजी आव्हाड आणि विलास शिरोळे आदिंसह मोठ्या प्रमाणावर शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन सरचिटणीस केशव घुगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सोमनाथ गळंगे यांनी मानले.

