संगमनेर महाविद्यालय सेवकांच्या पतसंस्थेकडून गुणवंतांचा गौरव

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील संगमनेर महाविद्यालय सेवकांच्या सहकारी पतसंस्थेतर्फे दरवर्षी पतसंस्थेचे सभासद अथवा त्यांच्या पाल्यांचा त्यांनी शैक्षणिक अथवा इतर क्षेत्रात गुणवत्ता दाखविल्याबद्दल सन्मान केला जातो. यंदाही ‘गुणवंत सन्मान सोहळा’ हा कोविड नियमांचे पालन करून नुकताच पार पडला.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा, डॉ. रवींद्र तासिलदार, श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजेंद्र ढमक, पर्यवेक्षक प्रा. आप्पासाहेब गुंजाळ, प्रा. डॉ. वंदना भवरे, प्रा. डॉ. जितेंद्र पाटील, प्रा. विमल निर्मळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आणि पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. संजयकुमार दळवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. अशा उपक्रम दिवसास ‘प्रेरणा दिन’ असे नाव देऊन नवीन पिढीसमोर मार्गदर्शनासाठी भविष्यात ‘मार्गदर्शन मंच’ लवकरच तयार करणार असल्याचे प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी सांगितले. याप्रसंगी प्रियंका जाधव, अंशु तासिलदार, अमृता चोबे, शुभम वडीतके, साहिल घुगे, श्रेया निमसे, वृंदा पाटील, नेहा चव्हाण, वैदेही चव्हाण, कल्याणी सानप, आम येलमामे, पीयूष दिघे, गायत्री आहेर, निकिता मोरे, यशश्री महाले, सिद्धेश कानवडे व प्रा. विद्या आडभाई यांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन पतसंस्थेच्या संचालिका प्रा. रंजना सानप यांनी तर प्रास्ताविक उपाध्यक्ष प्रा. अशोक निमसे यांनी तर आभार पतसंस्थेचे सचिव संतोष मंडलिक यांनी मानले. प्रा. डॉ. गोरक्षनाथ सानप, संजय काशिद, प्रा. अमोल कडलग, डॉ. मारुती कुसमुडे, रुपेश वालझाडे आदी संचालकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Visits: 3 Today: 1 Total: 29466

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *