कोपरगावातील प्रभाग पाचमध्ये कचर्‍याचे साम्राज्य

कोपरगावातील प्रभाग पाचमध्ये कचर्‍याचे साम्राज्य
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरातील प्रभाग क्रमांक 5 म्हणजेच पांडे गल्ली परिसरात विविध ठिकाणी कचर्‍याचे ढीग पडलेले दिसत आहेत. यामुळे मोकाट कुत्रे, डुक्कर व गाढवांचा वावर वाढला असून सर्वत्र प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. तसेच अनेक ठिकाणी ड्रेनेज देखील फुटलेले असल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. सदर विषय स्थानिक लोकप्रतिनिधींच्या वारंवार कानावर घालून देखील ते याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सध्या कोरोनाचे संकट चालू असून स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र याकडे स्थानिक लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याने संतापलेल्या नागरिकांच्यावतीने शिवसेनेचे विभागप्रमुख मयूर दळवी यांनी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन दिले आहे. सदर प्रश्न त्वरीत मार्गी न लागल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी प्रकाश भडकवाडे, मोनू दळवी, तुषार म्हसे, सुशील धाडीवाल, बंटी दरुंटे, जुबेर अत्तार, कृष्णा दळवी, आदित्य निकुंभ, यश कराळे, अजय दळे, हृषीकेश वाघ, आशुतोष दळवी, किरण घेगडमल आदी उपस्थित होते.

 

Visits: 212 Today: 1 Total: 2120151

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *