बाभळेश्वर येथे पतीकडून पत्नीस मारहाण

बाभळेश्वर येथे पतीकडून पत्नीस मारहाण
नायक वृत्तसेवा, राहाता
दुसर्‍याचे उसने पैसे देण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये आणण्यास सांगून विवाहितेने त्यास नकार दिल्याने पतीने शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे नुकतीच घडली आहे.

या प्रकरणी विवाहिता भारती भाऊसाहेब कोळकर यांनी लोणी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, मी माझे पती भाऊसाहेब, सासू सिंधुबाई मुलांसह बाभळेश्वर येथे एकत्र राहते. दरम्यान, येथीलच एका महिलेचे उसने पैसे देण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये घेऊन ये तरच तुला नांदवेन असे सांगितले. त्यावर विवाहितेने नकार दिल्यावर पतीने शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. यावरुन पोलिसांनी पती भाऊसाहेब एकनाथ कोळकर याच्याविरोधात गुरनं.671/2020 भादंवि कलम 323, 504 आणि 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणी पोलीस करत आहे.

 

Visits: 152 Today: 1 Total: 2168315

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *